‘प्रतिष्ठान’चा ‘सर्वज्ञ श्रीचक्रधर अष्ट जन्मशताब्दी विशेषांक’ : सर्वज्ञांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कार्याच्या विविध पैलूंवर प्रकाश

प्रस्तुत वर्ष हे सर्वज्ञ श्रीचक्रधरांचे अष्ट जन्मशताब्दी वर्ष! मराठी भाषकांसाठी ही मोठीच आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या भूमीत पहिल्यांदा समाजक्रांतीचे बीज पेरले ते श्रीचक्रधरांनी. वर्णव्यवस्थेला नाकारत सर्व जातीवर्णातल्या लोकांना त्यांनी जवळ केले. स्त्रीस्वातंत्र्याचा उच्चार जाहीरपणे करत त्यांना मोक्षाचा अधिकार बहाल केला. मराठीसारख्या लोकभाषेला धर्मभाषेचा दर्जा देऊन तिच्या वापराचा आग्रह धरला.......